0

 अभिनेत्री, कवयित्री, नृत्यांगना, सुत्रसंचालिका अशी आपली वैविध्यपूर्ण ओळख प्राजक्ता माळीने निर्माण केली आहे. 2022 ह्या वर्षी प्राजक्ता आता निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवतेय. निर्माती बनण्यासाठी ती जेवढी झटून काम करत आहे,तेवढीच सध्या ती आपल्या एक्टिंग प्रोजेक्टसाठीही उत्सुक आहे.

प्राजक्ताच्या यंदा 4 नव्या कलाकृती रसिकांसमोर येतील. लकडाऊन, पावनखिंड,चंद्रमुखी हे सिनेमे आणि रानबाजार ही वेब सीरिज यंदा रिलीज होणार आहे. लकडाऊन चित्रपटातून ती पहिल्यांदाच सुपरस्टार अंकुश चौधरीसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तर पावनखिंड मधून युध्दपटाचा भाग होण्याची संधी तिला पहिल्यांदाच मिळालीय. चंद्रमुखी सिनेमातून पहिल्यांदाच ती सुप्रसिध्द संगीत-दिग्दर्शक अजय-अतूलच्या गाण्यावर नाचताना दिसणार आहे. तर रानबाजार ह्या वेबसीरिजमधून ती पहिल्यांदाच वेश्याव्यवसायातील एका स्त्रीची भूमिका रंगवताना दिसेल. रानबाजार वेबसीरिजने प्राजक्ताचं ओटीटीविश्वात पदार्पण होतंय.

Post a Comment

 
Top