0

 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांची मुलगी सना गांगुली हिला कोरोनाची लागण झाली आहे. सनाचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, तिच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सनाने स्वत:ला आयसोलेट केले आहे.

अलीकडेच सौरव गांगुलीलाही कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्याला काही दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सौरव गांगुलीला कोरोनाचा डेल्टा प्रकार होता, तर ओमिक्रॉनचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

काही दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर सौरव गांगुलीला डिस्चार्ज देण्यात आला होता, मात्र तो घरीच आयसोलेशनमध्ये होता. आणि आता त्यांची मुलगी सना हिचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

Post a Comment

 
Top