0

 लानेच आपल्या जन्मदात्या आईचा खून करुन नंतर स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणेश मनोहर फरताडे (वय 42) आणि निर्मला मनोहर फरताडे (वय 76) असे या दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील धनकवडी परिसरात ही घटना घडली असून, कर्जबाजारीला कंटाळून गणेशने आपल्या आईची हत्या करत नंतर स्वतः आत्महत्या केल्याचे पाऊल उचलले आहे. त्याने आईला औषधांचा ओव्हरडोस देऊन नंतर तिची दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेत जीवन संपवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश फरताडे हा इंजिनिअर होता. मात्र त्याची नोकरी गेली होती. पाच वर्षापुर्वी त्याच्या वडीलाचे देखील आजारामुळे निधन झाले होते. वडीलांच्या उपचारावर बरेच पैसे खर्च केल्यानंतर आणि नोकरीही गेल्याने तो नेहमी तनावात राहायचा. आई निर्मला फडतरे या देखील आजारी राहायच्या तसेच त्यांच्या गोळ्या-औषधांसाठी अनेक पैसे खर्च व्हायचे. एकीकडे नोकरी नाही आणि कर्जबाजारीपणामुळे तो नैराश्यात गेला होता. त्यामुळे त्याने आई निर्मला फरताडे यांना औषधांचा ओव्हरडोस दिला. त्यानंतर दोरीने गळा आवळला. त्यामध्ये निर्मला यांचा मृत्यू झाला. यानंतर स्वतः देखील घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.

आपल्यामागे आईला कोण पाहणार त्यामुळे गणेश सुरुवातीला आईला औषधांचा ओव्हरडोस दिल्या. ती निपचिप पडल्यानंतर त्याने आईच्या चेहऱ्यावर प्लॉस्टिक पिवशी बांधून एका दोरीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने शनिवारी दुपारी 2 वाजून 10 मिनीटांनी एक मॅसेज केला. आपण बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळले असून, आत्महत्या करत आहे. एक मॅसेज त्याने नातेवाईकाला केला. त्यानंतर छतावर जात त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या प्रकरणी गणेश फडतरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा सहकारनगर पोलिसांनी दाखल केला आहे. शनिवारी धनकवडी येथील एका सोसायटीत ही घटना घडली. याबाबत शोनीत तानाजी सावंत यांनी तक्रार दिली आहे.

Post a Comment

 
Top