तनिषा मुखर्जी अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. अलीकडेच तिने नवीन वर्षातील काही फोटो शेअर केले होते, जे सध्या बरेच व्हायरल होत आहेत. तनिषाने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तिने पायात जोडवी घातलेली दिसत आहेत. तनिषाने शेअर केलेल्या फोटोमुळे ती विवाह बंधनात अडकल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
लॉकडाउनमध्ये शिकलेले कौशल्य सांगितले
तनिषाने पोस्टमध्ये लिहिले – 'माझ्या पायाच्या बोटांवर वाळू आणि माझ्या आत्म्यात समुद्र! मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. प्रत्येक क्षण जगत आहे. मी स्वतः बनवलेला क्रोशेट टॉप घालून नवीन वर्षाची सुरुवात केली! लॉकडाउनमध्ये मी ब-याच नवीन गोष्टी शिकले. आणि मर्यादित आयुष्यातील सर्व अस्वस्थता या सुंदर सर्जनशील उर्जेमध्ये बदलली!', अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे.
Post a Comment