0

 मर जगतावरही आता ओमायक्रॉनचे सावट पडताना दिसत आहे. देशात बऱ्याच ठिकाणी सुरू असलेल्या शूटिंगवर तसेच रिलीज होणाऱ्या चित्रपटावरही याचा परिणाम झाल्याचे जाणवत आहे. मात्र चित्रपटागृहात प्रेक्षकांची संख्या थोडीफार दिसत असल्याने इंडस्ट्रीला थोडा दिलासा वाटत आहे. शूटिंग शेड्यूल्सविषयी बोलायचे झाले तर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात सुरू असलेले सुमारे अर्धे डझन प्रोजेक्ट्स पुढे ढकलण्यात आले आहेत. ज्यांचे शूटिंग जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणार होते आता ते मार्च-एप्रिलमध्ये होणार आहे.

याचा परिणाम विकी कौशल आणि सारा अलीच्या नाव न ठरलेल्या चित्रपटाच्या इंदूर शेड्यूलवरही झाला आहे. दोघेही 27 जानेवारीपर्यंत तेथे शूटिंग करणार होते, मात्र आता निर्मात्यांनी आता आठवड्याभरातच परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्यात सतीश कौशिकदेखील शूटिंगसाठी इंदूरला येणार होते, मात्र ओमायक्रॉनच्या धोक्यामुळे ते मध्य प्रदेशात येऊ शकले नाहीत. या चित्रपटाचे काही रात्रीचे शूटिंग उरले आहे, ते निर्माते पूर्ण करण्यात लागले आहेत.

या प्रोजेक्ट्सवर झाला परिणाम
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील सुमारे 6 ते 7 प्रकल्पांच्या शूटिंगवर परिणाम झालाे. जाणून घ्या या प्रकल्पांची माहिती...

  • मणिरत्नम, ऐश्वर्या राय बच्चनसोबत ‘पोन्नियन सेल्वन’ चित्रपटाचे उरलेले शूटिंग करण्यासाठी दोन आठवड्यांसाठी मध्य प्रदेशात येणार होते. मात्र त्यांनीदेखील आपले शेड्युल पुढे ढकलले आहे.
  • फेब्रुवारीमध्ये, विपुल अमृतलाल शाह भोपाळजवळील झाबुआमध्ये कतरिना कैफसोबत चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार होते. तेही आता वाढवण्यात आले आहे.
  • ‘कोटा फॅक्टरी’ ही वेब सीरिज फेब्रुवारीमध्ये तर ‘पंचायत’ ही वेब सीरिज मार्चमध्ये शूट होणार होती. त्याचेही काम पुढे ढकलले आहे.
  • उत्तर प्रदेशात शाहरुख खानचे बॅनर रेड चिलीजचा एक प्रकल्प या आठवड्यापासून सुरू होणार होता पण आता तो पुढे ढकलण्यात आला आहे.

Post a Comment

 
Top