कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा तिपटीने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून एकानंतर एक निर्बंधांचे आदेश जारी केले जात आहेत. आता महाराष्ट्र सरकारने सर्वच महानगरपालिकांना त्यांच्या बंधनकारक तसेच वैधानिक सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईसह राज्यात ओमायक्रॉन आणि कोरोना रुग्णांची संख्या दिवेंदिवस झपाट्याने वाढत आहे. शासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन मोठ्या प्रमाणातील एकत्रिकरण टाळण्यासाठी काही निर्बंध जारी केले आहेत. यानुसार, मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या बैठका, (बंधनकारक आणि वैधानिक) महासभा, स्थायी समिती व इतर समित्यांच्या बैठका व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून/ ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्या.
Post a Comment