0

 ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)च्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमेटीने भारत बायोटेकची नेजल व्हॅक्सीन (नाकातून दिली जाणारी व्हॅक्सीन) च्या तिसऱ्या फेजच्या ट्रायलला मंजूरी दिली आहे. तया प्रकरणाविषयी कमिटीने मंगळवारी मीटिंग केली होती. ट्रायलनंतर नेजल व्हॅक्सीनला कोरोना बूस्टर डोस म्हणून इमरजेंसी वापराची मंजूरी मिळू शकते. कमिटीने मंजूरीसंबंधीत डॉक्यूमेंट्स सबमिट करण्यास सांगितले आहे.

मंगळवारी देशात ओमायक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या 2000 पार झाली. आतापर्यंत देशात एकूण 2220 ओमायक्रॉन संसर्गाची पुष्टी झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत 272 नवीन रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉन संसर्ग देशाच्या 24 राज्यांसह केंद्र शासित प्रदेशांमध्ये पसरला आहे.

महाराष्ट्रात नवीन व्हेरिएंटचे सर्वात जास्त 653 संक्रमित आढळले आहेत. दिल्ली 382 संक्रमितांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या व्यतिरिक्त केरळ, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये ओमायक्रॉनचे जास्त प्रकरणे आढळले आहेत.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment

 
Top