0

 महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणाचे काम संथ गतीने सुरू असून त्यात गती आणावी असा सल्ला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिला. केंद्राकडून सर्व प्रकारची मदत करण्यात आली. राज्याने केलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जात आहेत. तरीही राज्यात कोरोना नियंत्रणाच्या कामाला गती मिळालेली नाही. यासोबत, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्या लॉकडाउनचे अधिकार सुद्धा केंद्राने राज्यांना दिले आहेत असे भारती पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

राज्याचे काम संथ गतीने

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे देशभर रुग्णांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात तर ही संख्या तीन पटीने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने विविध राज्यांचा आढावा घेतला. त्यावरूनच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पत्रकार परिषद घेत संक्षिप्त माहिती दिली.

मी महाराष्ट्रातूनच असल्याने राज्यातील परिस्थितीची जाणीव आहे. त्याच अनुषंगाने आधीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा झाली. सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला. परंतु, कोरोना नियंत्रणासाठी ज्या गतीने काम व्हायला हवे त्या गतीने काम होत नाही असे भारती पवार यांनी सांगितेल आहे.

हा राजकीय आरोप नाही

राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जात आहेत. कोरोनाच्या लसींचा पुरवठा सुद्धा करण्यात आला. तसेच केंद्र सरकारने कोरोना नियंत्रणासाठी निधी सुद्धा दिला. आता त्या निधीचा वापर कसा होतो हे राज्य सरकारवर विसंबून आहे. यात केंद्र सरकार कुठे कमी पडत आहे हे सांगावे. असे आव्हान सुद्धा राज्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिले.

दरम्यान, प्रत्येक राज्यावर केंद्राचे बारकाईने लक्ष आहे. सर्व राज्यांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. अशात महाराष्ट्रात राजकीय आरोप केले जात नाहीत. असेही भारती पवार यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

 
Top