बुली बाई अॅप'वर मुस्लीम महिलांची बोली लावल्याप्रकरणी एक विचित्र खुलासा समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी उत्तराखंडमधून एका तरुणीला अटक केली आहे. ही तरुणी या संपूर्ण प्रकरणाची सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे, म्हणजेच ती महिलांची बोली लावत होती.
मुंबई पोलिसांचे एक पथक उत्तराखंडमध्ये हजर असून मंगळवारी ट्रान्झिट रिमांडवर मुलीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहे. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर तिला बुधवारी मुंबईत आणण्यात येणार आहे.
दुसरीकडे, याप्रकरणी बंगळुरू येथून अटक करण्यात आलेला सॉफ्टवेअर अभियंता विशाल झा याला मुंबईतील वांद्रे महानगर न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सुमारे अर्धा तास सुनावणी घेतल्यानंतर आरोपीला 10 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. झा हे मूळचे बिहारचे आहेत.
तीन अकाऊंट हँडल करतेय आरोपी महिला
मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी तरुणी 'बुली बाई' अॅपशी जोडलेली तीन अकाऊंट हाताळत होती. सहआरोपी विशाल कुमार याने 'खालसा वर्चस्ववादी' या नावाने खाते उघडले.
मुख्य आरोपी तरुणी आणि विशाल झा हे दोघे चांगले मित्र आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांमध्ये मैत्री झाली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही नाव बदलायचे आणि सोशल मीडियावर अकाउंट चालवायचे. त्यांनी शीख संघटनांच्या नावाने काही खाती उघडली होती. सायबर सेलची टीम या सोशल अकाउंटची चौकशी करत आहे. या महिलेची ओळख सध्या उघड झालेली नाही.
Post a Comment