झारखंडच्या पाकुडमध्ये बुधवारी सकाळी एका भीषण अपघातात 10 लोकांचा मृत्यू झाला. पाकुडहून दुमका येथे जात असलेली बस लिट्टीपाडा-अमडापाडा रोडवर पडेरकोलाजवळ गँस सिलेंडरने भरलेल्या ट्रकला धडकली. बसमध्ये 40 पेक्षा जास्त लोक होते अशी माहिती मिळाली आहे. यामध्ये जवळपास 25 लोक जखमी आहेत.
ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. बसमध्ये बसलेले लोक त्यात अडकले. बसची बॉडी कापून लोकांना बाहेर काढले जात आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
Post a Comment