पंजाबमध्ये भारतातील पहिला ‘बुद्धिमान रस्ता’ ४० लाख रुपये खर्चातून तयार होत आहे. मोहाली विमानतळाकडे जाणाऱ्या या १० किमी रस्त्याला आयआयटी रुरकी विशेष सेन्सरयुक्त करणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रकारचा तांत्रिक अभ्यास झाला आहे. पंजाबच्या वाहतूक सल्लागार कार्यालयाने या प्रकल्पाला डेव्हलपमेंट ऑफ इंटेलिजंट मोबिलिटी अँड इफिशियंट ट्रॅफिक कंट्रोल सिस्टिम नाव दिले आहे. यात केवळ रस्ता अपघात टाळण्याची व्यवस्था नसेल तर पेट्रोल बचतही होईल. रस्त्यावर चालणाऱ्या रुग्णवाहिकेचे वाचन करून स्पेशल सेन्सर तिला वेगळी जागा देईल. एवढेच नव्हे तर एखादे वाहन वळत असेल किंवा मागे येत असेल तर सेन्सर आवाज करून अन्य वाहनांना सतर्क करेल. रस्त्यावर काही होत असेल तर त्यासमोर येणाऱ्या वाहनांना लांबूनच अलर्ट मिळेल.
पंजाब पोलिस, आयआयटी रुरकी आणि पंजाबमध्ये कार्यरत सेफ सोसायटीत एक सामंजस्य करार झाला आहे. हा प्रकल्प पंजाब रस्ते सुरक्षा अथवा ट्रॅफिक रिसर्च सेंटर मोहालीच्या देखरेखीखाली लागू केला जाईल.
Post a Comment