रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आखलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास बँकांना कारवाईला सामोरे जावे लागते. कर्जाबाबतच्या वैधानिक आणि इतर निर्बंधांबाबत केलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याने RBI ने अशाचप्रकारे एका बँकेवर दंडात्मक कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एमयूएफजी (MUFG) बँकेवर ही दंडात्मक कारवाई केली असून, या बँकेला 30 लाख रुपया्ंचा दंड भरावा लागणार आहे.एमयूएफजी बँकेने कर्जाबाबत आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, MUFG बँकेने अशा कंपन्यांना कर्ज दिले आहे ज्यांच्या संचालक मंडळात इतर बँकांच्या संचालकांचा समावेश होता. हे स्पष्टपणे आरबीआयच्या कर्जासंदर्भातील वैधानिक नियमांचे उल्लंघन आहे. यासह 11 मार्च 2019 रोजी करण्यात आलेल्या आर्थिक स्थितीच्या पर्यवेक्षण मुल्यांकनानुसार आरबीआयला असे आढळून आले की इतर कंपन्यांना कर्ज देण्याबाबत अन्य काही निर्देशांचे पालनही या बँकेने केले नाही आहे. आरबीआयने MUFG बँकेला पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिशीनंतरच ही कारवाई करण्यात आली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment