0

  जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Omicron variant of Coronavirus) चिंता वाढली आहे. त्यातच महाराष्ट्रत ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे आता शाळा (School) पुन्हा बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच दरम्यान आता आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी एक भीती व्यक्त केली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, शाळा नियमित सुरू राहतील मात्र निर्बंध कटाक्षाने पाळावे. आज ओमयक्रोन आकडा शंभरीत असताना डबल ने वाढतोय, जर हजारावर आकडा जाऊन दुपटीने अशीच वाढ झाल्यास परिस्थिती चिंताजनक होईल. ओमायक्रोनचा वाढता प्रभाव आणि शाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या लसीकरणाची गरज असल्याचंही राजेश टोपे म्हणाले.

Post a Comment

 
Top