भारतातील मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी एकानंतर एक रिचार्जचे दर वाढवण्यास सुरुवात केली आहे. एअरटेल आणि Vi (व्होडाफोन-आयडिया) नंतर आता जिओने आपले रीचार्ज प्लॅन महाग केले आहेत. जिओने आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये 21% टक्के पर्यंतची वाढ केली आहे. यापूर्वी मिळणारे 75 रुपयांचे प्लॅन आता 1 डिसेंबरपासून 91 रुपयांत घ्यावे लागणार आहे.
अशी राहील नवीन किंमत
आतापर्यंत 129 रुपयांत मिळणाऱ्या प्लॅनसाठी 155 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 399 रुपयांत येणाऱ्या प्लॅनसाठी 479 रुपये खर्च करावे लागतील. यासोबतच, 1299 च्या प्लॅनसाठी 1,559 रुपये आणि 2,399 च्या प्लॅनसाठी आता 2,879 रुपये एवढा खर्च येणार आहे.
डेटा टॉप-अपच्या किमती सुद्धा वाढवण्यात आल्या आहेत. आता 6 GB डेटासाठी 51 तर 61 रुपये द्यावे लागतील. 12 GB च्या प्लॅनसाठी आतापर्यंत 101 रुपये घेतले जात होते. त्यासाठी आता 121 रुपये वसूल केले जाणार आहेत. 50 GB च्या डेटाची किंमत सुद्धा 251 वरून 301 रुपये करण्यात आली आहे.
तरीही सर्वात स्वस्त प्लॅन जिओचे
रेट वाढवण्याच्या बाबतीत आकडेवारी पाहिल्यास एअरटेल आणि Vi च्या तुलनेत अजुनही जिओचे प्लॅन स्वस्त ठरतील. एअरटेल आणि Vi चे बहुतांश प्लॅन एकसारखेच आहेत.
कंपन्यांनी आप-आपले प्लॅन महाग करण्यासाठी सरासरी महसूल (ARPU) चे कारण दिले आहे. प्रति यूजर महसूलात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे, मोबाईल कंपन्यांना भाववाढ करून नुकसानीची भरपाई करावी लागत आहे असे सर्वच कंपन्यांकडून सांगितले जात आहे.
Post a Comment