0

 कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट भारतात सापडल्यानंतर नवीन वर्ष तिसरी लाट घेऊन येऊ शकतो. IIT कानपूरचे प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांच्याकडून ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या डेटाचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यातूनच हे तथ्य समोर आले आहे. भारतात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान प्राध्यापक अग्रवाल यांनी केलेला कोरोनाचा डेटा अ‍ॅनालिसिस चर्चेत होता.

प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे, नाइट कर्फ्यू, गर्दीच्या ठिकाणांवर बंदी असे नियम लागू केल्यास कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यात मदत होईल. जगभरात फोफावणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असताना अग्रवाल यांनी दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांच्या व्हायरस डेटाचा अभ्यास केला. तसेच भारतातील माहितीच्या आधारे त्याचे विश्लेषण केले. यावरूनच दिव्य मराठीने प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांची मुलाखत घेतली आहे.

प्रश्न: जगभरात ओमायक्रॉन इतक्या झपाट्याने पसरत आहे. भारतात सुद्धा याची प्रकरणे सापडली आहेत. तुम्ही ज्या आकडेवारीचा अभ्यास केला त्यानुसार भारतावर काय परिणाम होतील?

उत्तर: ओमायक्रॉन व्हेरिएंटचा डेटा आम्हाला दक्षिण आफ्रिकेतून मिळाला आहे. त्याचा अभ्यास करून आम्ही आमचे निष्कर्ष काढले आहेत. त्यानुसार, 2022 च्या सुरुवातीच्याच महिन्यात अर्थात जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. फेब्रुवारी 2022 मध्ये कोरोना रुग्णांची आकडेवारी उच्चांक गाठेल. ती दीड लाख दैनंदिन रुग्णांपर्यंत जाऊ शकते. दक्षिण आफ्रिकेत काही महिन्यांपूर्वी कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला होता. त्यावेळी त्याचे प्रसरण कमी होते. कारण, 80% पेक्षा अधिक लोकांच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता होती. या लोकांना आधीच कोरोना होऊन गेला होता. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन झपाट्याने वाढत आहे.

प्रश्न: भारतात ओमायक्रॉन पसरण्याचा वेग कसा राहील?

उत्तरः ओमिक्रॉन व्हेरिएंट लोकांच्या नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती कशी चुकवत आहेत त्याची माहिती आफ्रिकेच्या दुसऱ्या डेटामधून समोर आली आहे. त्यातून ओमायक्रॉन नॅचरल इम्यूनिटीला बायपास करणार नाही अशी अपेक्षा आहे. पण चिंतेची बाब म्हणजे, हा व्हेरिएंट डेल्टापेक्षा दुपटीने पसरतो. त्यामुळे भारतात सुद्धा त्याचा प्रसार दुप्पट राहील. भारतात 80% पेक्षा अधिक लोक नैसर्गिकरित्या इम्यून झाले आहेत. पुढच्या वर्षी या व्हेरिएंटचे वाइट परिणाम समोर येतील.

प्रश्नः शाळेत जाणारी मुलं, दिवसभर बाहेर काम करणारे लोक, महिला यांच्यावर ओमायक्रॉनचा प्रभाव कसा राहील?

उत्तरः ओमायक्रॉनबाबत अजूनही अनेक गोष्टी समोर येणे बाकी आहे. परंतु, प्रश्न असा आहे की लसींचे दोन्ही डोस घेतलेले लोक ओमायक्रॉनने आजारी पडत आहेत का? आमच्या अभ्यासानुसार हा व्हेरिएंट दोन्ही लस घेतलेल्यांना डेल्टा संक्रमित करतो. पण, त्यांच्यात गंभीर लक्षणे नसतात. ओमायक्रॉनबद्दल असेच राहिल्यास बहुतांश लोकांना सर्दी-खोकला, ताप इत्यादी येऊन ते बरे देखील होतील. लहान मुलांमध्ये सुद्धा याचा वाइट परिणाम होणार अशी अपेक्षा आहे. त्यामुळे, खूप घाबरण्याचे कारण नाही. पण, सावधगिरी आवश्य बाळगायला हवी.

प्रश्नः ज्यांनी कोरोनाचे लस घेतलेले नाहीत किंवा एकच डोस घेतला आहे, अशा लोकांवर ओमायक्रॉनचा काय परिणाम होईल?

उत्तरः ज्यांनी एकच डोस घेतला आहे, त्यांनी दुसरा डोस आवश्य घ्यावा. दुसरा डोस टाळू नका. ज्यांनी व्हॅक्सीन घेतलेलेच नाही त्यांनी घ्यावे.

प्रश्नः ओमायक्रॉन व्हेरिएंटचे संक्रमण वाढल्यास भारतात कशा स्वरुपाचे निर्बंध पाहायला मिळू शकतात?

उत्तरः डेल्टा व्हेरिएंटचा अभ्यास केला त्यातून आमच्या लक्षात आले की खूप कडक लॉकडाउन करण्याचा फायदा होत नाही. तसेच निर्बंध खूप कमी असतील तरीही त्याचा काहीच फरक पडत नाही. त्यामुळे, वेळीच गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध आणावे. बंद असलेल्या जागांवर जास्त लोकांनी जमू नये. सर्वांनी तोंडावर मास्कचा वापर करावा. सर्वच दुकाने आणि बाजारपेठांसह वाहतूक सेवा बंद करता नाही आले तरीही संक्रमणाचा वेग कमी केला जाऊ शकतो. सरकारला काही प्रमाणात निर्बंध लावावे लागतील. काही ठिकाणी सरकारला निर्बंध लावायला हवे. परंतु, कठोर लॉकडाउन लावू नये. कोरोनाच्या रुग्णांमध्ये आठड्यानुसार संख्या कमी जास्त होत असते. रविवार आणि सोमवारी जास्त रुग्ण सापडतात तर मंगळवारी खूप वाढतात. गुरुवार आणि शुक्रवारी रुग्णांचा आकडा उच्चांक गाठतो.

प्रश्नः ज्या लोकांमध्ये कोरोनापासून नैसर्गिक इम्युनिटी तयार झाली त्यांच्यावर ओमायक्रॉनचा प्रभाव आहे?

उत्तरः सर्वांना वाटते की ओमायक्रॉनमुळे कोरोनाचे रीइन्फेक्शन वाढेल. अर्थात एकदा कोरोना झालेल्यांना पुन्हा ओमायक्रॉन व्हेरिएंट संक्रमित करेल. पण, तसे नाही. आतापर्यंत झालेल्या अभ्यासानुसार गेल्या तीन महिन्यांत रीइन्फेक्शन तीन पटीने वाढले आहे. असे असले तरीही हे प्रमाण खूपच कमी आहे. दक्षिण आफ्रिकेत संक्रमित होणाऱ्यांपैकी केवळ 1% लोकांना पुन्हा कोरोना झाला. त्यावरून ही आकडेवारी खूप कमी आहे. कालांतराने रीइन्फेक्शनची शक्यता वाढत जाते. ओमायक्रॉन नॅचरल इम्युनिटीला बायपास करत आहे. परंतु, त्यापासून धोका कमी असल्याचेच दिसत आहे.

प्रश्नः ओमायक्रॉन आणि तिसऱ्या लाटेची शक्यता यासाठी सरकारला आपल्या प्लॅनिंगमध्ये काय बदल करावे लागतील?

उत्तरः सरकारने खूप कडक निर्बंध लावण्याची गरज नाही. कुठल्याही नवीन व्हेरिएंटने भीती वाटते यात काहीच वाद नाही. सतर्क राहावे लागेल. परंतु, कठोर निर्बंध नको. बाकी सरकारकडे जास्त माहिती असते. त्यामुळे, त्यांच्या आकडेवारीप्रमाणे ते निर्णय घेतीलच...

Post a Comment

 
Top