भारतातील सुमारे 49 कोटी नागरिकांच्या शरीरात व्हिटॅमिन-D ची कमी असल्याचे समोर आले आहे. सायन्स जर्नल नेचरने नुकतेच एक रिसर्च केले असून, त्यामधून ही बाब समोर आली आहे. यापूर्वी 2020 मध्ये केलेल्या रिसर्चमध्ये असे समोर आले होते की, देशातील सुमारे 76% जनतेच्या शरीरात व्हिटॅमिन-D ची कमरता आहे. तंज्ञाना याचे कारण विचारले असता, असे समोर आले की, प्रदूषण, जंक फूड खाणे, पौष्टिक अन्न न मिळणे तसेच लॉकडाऊनच्या काळात जास्त वेळ घरातच बसणे यामुळे सुमारे 76% जनतेत व्हिटॅमिन-D ची कमरता आली आहे.
रिसर्चंमधून काय आले समोर
सायन्स जर्नल नेचरने केलेल्या रिसर्चनुसार, भारत, पाकिस्तान, अफगानिस्तान आणि तुनीसिया यासारख्या देशात 20% जनतेच्या शरीरात व्हिटॅमिन-D ची कमरता आली आहे. त्यानूसार भारतात 49 कोटी नागरिकांनी व्हिटॅमिन-D ची कमरता आहे. तर अमेरिका, कॅनडा आणि यूरोपसारख्या देशात याचा आकडा 5.9%, 7.4% आणि 13 इतका आहे. रिसर्चमधून असे समोर आले आहे की, लॉकडाऊन लागल्याने अनेकांच्या शरिरात व्हिटॅमिन-D च्या कमरतेचे प्रमाण अधिक वाढले आहे.
व्हिटॅमिन-D चे डिप्रेशनसोबत कनेक्शन
व्हिटॅमिन- D आणि मानसिक आरोग्याचा काय संबंध आहे? याचे कारण माहिती करून घेण्यासाठी जगभरात संशोधन केले जात आहेत. लॉरेन हार्म्स यांच्यानूसार, व्हिटॅमिन- D च्या कमतरतेमुळे न्यूरोलॉजिकल विकार होण्याची शक्यता अधिकची आहे. कोरियामध्ये झालेल्या एका संशोधनात ज्या लोकांचा समावेश करण्यात आला होता, त्यांच्यामध्ये नैराश्यासोबतच व्हिटॅमिन-D ची कमतरता असल्याचे दिसून आले. कॅनडाच्या मॅकमास्टर विद्यापीठाच्या संशोधनात देखील असेच काहीसे समोर आले होते.
'सनशाईन व्हिटॅमिन'चा संबंध झोपेशी आहे. हे मेलाटोनिन आणि सेरोटोनिन नावाच्या दोन हार्मोन्सचे नियमन करते, जे आपल्या झोप आणि मूडवर परिणाम करतात. चिंता टाळण्यासाठी आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे जीवनसत्व खूप महत्वाचे असते.
कसे वाढवा व्हिटॅमिन- D
व्हिटॅमिन- D वाढवण्याचे सर्वात मोठे स्त्रोत सुर्यप्रकाश हे आहे. त्यासोबतच मासे, प्राण्यांची चरबी, संत्रीचा ज्यूस, दुध आणि अन्नाचे सेवन या सर्वांमुळे शरीरात व्हिटॅमिन- D वाढण्यास मदत होते. तज्ञांचे असे म्हणणे आहे की, काळी त्वचा असलेल्या लोकांमध्ये मेलेनिन (त्वचेचे रंगद्रव्य) कमी असते, ज्यामुळे व्हिटॅमिन- D चे उत्पादन त्यांच्या शरीरीत कमी होते. म्हणूनच त्यांनी जास्त वेळ उन्हात बसावे. बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) योग्य ठेवल्यास व्हिटॅमिन-डीची कमतरताही पूर्ण होऊ शकते, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
Post a Comment