सोशल मीडिया अॅप्स व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच अॅनिमेटेड इमोजी मिळणार आहेत. त्यासाठी कंपनीने एक नवीन फिचर्स तयार केले असून, सध्या त्यांची टेस्टिंग सुरू आहे. यावर्षी कंपनीला एका नव्या पॉलिसीमुळे मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. आपला तोटा भरण्यासाठी कंपनीने यावर्षी अनेक फिचर्स व्हॉट्सअॅपमध्ये दिले आहेत.
नववर्ष काही दिवसांवर येऊन ठेपले असताना, या वर्षाचा निरोप घेत कंपनी ग्राहकांसाठी अॅनिमेटेड इमोजीचे अनोखे गिफ्ट देणार आहे. अॅड्रॉइड आणि आयएसओ या दोन्ही सिस्टमच्या ग्राहकांना लवकरच अॅनिमेटेड इमोजीचा आनंद घेता येणार आहे. व्हॉट्सअॅप वेबसाठी हा फिचर्स यापुर्वीच प्रदान करण्यात आला आहे.
Post a Comment