लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. साराचा नवाकोरा चित्रपट 'अतरंगी रे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सारा अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष सोबत दिसणार आहे. लवकरच तिचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत साराने पहिल्यांदाच तिच्या लग्नाबद्दलही खुलासा केला. या मुलाखतीत साराला लग्नासाठी कसा मुलगा हवा आहे हे तिने सांगितले. लग्नासाठी साराने एक अट ठेवली आहे.
एका मुलाखतीत सारा म्हणाली की, मी अशाच मुलासोबत लग्न करेल जो माझ्या आणि माझ्या आईसोबत कायमचा राहण्यासाठी तयार असेल. सारा तिच्या आईच्या खूप जवळ आहे. लग्नानंतर सारा आपल्या आईला सोडून जाऊ इच्छित नाही. त्यामुळेच साराने लग्नासाठी ही एक अट ठेवली आहे.
Post a Comment