0

  बॉलिवूडमधील   (Bollywood)  कपूर कुटुंब   (Kapoor Family)  सर्वांनाच माहिती आहे. या कुटुंबाने मनोरंजनसृष्टीला अनेक अष्टपैलू कलाकार दिले आहेत.तसेच हे कुटुंब 'जॉईंट फॅमिली'चं एक उत्तम उदाहरण आहे. कोणताही सण असो किंवा पार्टी हे कुटुंब कायम सोबत सेलिब्रेशन करताना दिसून येतं. आपल्या कामातून वेळ काढून हे लोक प्रत्येक सणाला एकत्र येतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कपूर कुटुंबाने सोबत ख्रिसमसचं सेलिब्रेशन  (Christmas Celebration)  केलं आहे. त्यांचा एक सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु या फोटोमधून रणबीर कपूर   (Ranbir Kapoor)  आणि आलिया भट्ट  (Alia Bhatt) गायब आहेत.

अरमान जैननं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र दिसून येत आहे.हे सर्वजण ख्रिसमस लंचसाठी एकत्र जमले होते. ज्येष्ठ दिवंगत अभिनेते शशी कपूर आणि जेनिफर केंडल यांचा मोठा मुलगा कुणाल कपूरने या ख्रिसमस लंचक आयोजन केलं होतं.

Post a Comment

 
Top