0

 गेल्या काही दिवसांपासून राज्यात कडाक्याची थ पडत असल्याचं दिसत आहे. राज्यातील काही भागांत तापमानाचा पारा 7 अंशांवर गेल्याचंही पहायला मिळत आहे. त्यातच आता नागपुरातून (Nagpur) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरात विविध ठिकाणी पाच जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे या पाचही जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेमिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील कपिलनगर, गणेशपेठ आणि सोनेगाव या ठिकाणी तिघांचा मृत्यू झाला आहे. एका 65 वर्षीय वृद्धाचा फुटपाथवर मृतदेह आढळून आला आहे. एका व्यक्तीचा मृतदेह ट्रकमध्ये आढळून आला आहे. तर एका अनोळखी महिलेचा मृतदेह शोनेगाव परिसरात आढळून आला आहे. या पाचही जणांचा मृत्यू थंडत गारठून झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, अद्याप याला शासकीय यंत्रणेकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये.


Post a Comment

 
Top