0

 येत्या तीन दिवसांत तीन वेगळ्या दिशांना तीन मोसमी प्रणाली निर्माण होत असल्याने देशातील विविध भागात जोरदार पावसासह डोंगरी क्षेत्रात बर्फवृष्टी होईल. दक्षिण थायलंड आणि म्यानमारमध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारी अंदमान सागरात दाखल झाले असून येथे हळूहळू वायव्य आणि पश्चिमेकडे सरकत आहे. २ डिसेंबर रोजी ते हवेच्या मोठ्या दाबात रूपांतरित होण्याची शक्यता असून त्याच्या पुढील २४ तासांत ते चक्री वादळात रूपांतरित होईल.

४ डसेंबरला ते आंध्र प्रदेश आणि ओरिसाच्या किनाऱ्यापर्यंत पाेहोचेल. या वादळाचे नाव जवाद ठेवण्यात आले आहे. तिकडे दुसरीकडे अरबी समुद्रातही कमी दबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी स्थिती जाणवू लागली आहे. याशिवाय पाकिस्तानकडून एक पश्चिमी विक्षोभही भारताच्या दिशेने सरकत आहे. तो डिसेंबरच्या रात्री वायव्य दिशेला धडकू शकते. पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रात निर्माण प्रणालीमुळे गुजरात आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. गुरुवारीही तोे मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सूरत, वलसाड आणि नवसारीत जोरदार पावसाची शक्यता आहे. २ आणि ३ डिसेंबरला पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्लीत पावसाची शक्यता आहे. दक्षिण पूर्व राजस्थानात २ डिसेंबरला मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये२ आणि ३ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी तसेच मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण होणार, सौदीने दिले नाव
जवाद वादळ बंगालच्या उपसागरात निर्माण होण्याची शक्यता आहे. वादळाची नावे आधीपासूनच ठरलेली असतात. दक्षिण आशियातील १३ देशांनी आपापल्या क्षेत्रातून येणाऱ्या वादळांसाठी १३-१३ (१६९) नावे ठरवली आहेत. २०२० मध्ये पहिले निसर्ग वादळ होते. जवाद नववे असेल. हे नाव सौदी अरबने दिले आहे. वादळामुळे आंध्रपदेशात तीन ते चार आणि ओरिसात ३ ते ५ डिसेंबरपर्यंत मुसळधार पाऊस होईल. पावसाची सर्वाधिक तीव्रता ४ डिसेंबरपर्यंत राहील. बंगाल किनाऱ्यावर जोरदार पाऊस होईल.

Post a Comment

 
Top