0

 ५ आॅगस्ट २०१९ राेजी कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राज्यातील राजकीय पक्ष जाेरदार प्रचाराला लागले आहेत. त्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. नॅशनल काॅन्फरन्स, पीपल्स डेमाेक्रॅटिक पार्टी, काँग्रेससह सर्व प्रमुख पक्ष राज्यातील मुस्लिमबहुल चिनाब खाेरे, पीर पंजाल रेंज भागात डझनावर जाहीर सभा घेऊ लागले आहेत. भाजप काश्मीर भागात पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी अलीकडेच काश्मीरच्या सीमेवरील भागात गुर्जर व बकरवाल समुदायापर्यंत संपर्कासाठी अनेक सभा घेतल्या. सरकार या समुदायाच्या कल्याणासाठी काम करेल, असे वचनही त्यांनी दिले. जम्मू-काश्मीर प्रशासनाने निवृत्त न्यायमूर्ती देसाई यांच्या अध्यक्षतेखालील परिसीमन आयाेग ६ मार्च २०२२ पर्यंत आपल्या अहवालास अंतिम रूप देऊ शकते, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कदाचित राजकीय पक्षांची सक्रियता वाढली असावी. कारण त्यानंतर निवडणूक जाहीर हाेऊ शकते. पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती चिनाब खाेरे व पीर रंजाल रेंजमध्ये जाहीर सभा घेत फिरत आहेत. या सभांतून त्या कलम ३७० हटवल्यावरून भाजपवर निशाणा साधू लागल्या आहेत. अशाच प्रकारे नॅशनल काॅन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला व उमर अब्दुल्ला यांनी अनेक सभा घेतल्या. उमर अब्दुल्ला आठ दिवसांपासून चिनाब खाेऱ्यात डेरा टाकून आहेत.

आता निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज झाले पाहिजे, अशी सूचना उमर अब्दुल्ला यांनी चिनाबमधील पक्ष कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्याने दिली. वास्तविक ३७० च्या बहालीपर्यंत निवडणूक लढणार नसल्याचे उमर यांनी जाहीर केले हाेते. त्यामुळेच त्यांच्या जाहीर सभांची स्थिती विचित्र वाटू लागली आहे. म्हणूनच ते म्हणाले, नॅशनल काॅन्फरन्स विधानसभेवरील बहिष्काराच्या चुकीची पुनरावृत्ती करणार नाही. आम्ही विधानसभा निवडणुकीवरही बहिष्कार घालावा असे त्यांना वाटते. परंतु आम्ही असे करणार नाही, असे उमर यांनी सांगितले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद एका दशकानंतर राज्यात सक्रिय हाेताना दिसत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर यांच्याविराेधात आझाद यांच्या समर्थकांनी बंडाचा झेंडा उभारला असतानाच आझाद सक्रिय झाले आहेत. आझाद जम्मू तसेच दक्षिण काश्मीरमध्ये जाहीर सभा करत आहेत. काँग्रेसने डावलल्यास ते नवीन पक्षाची स्थापना करू शकतात, असे चित्र दिसते.

काश्मिरातील पक्षांचे चिनाब आणि पीर पंजाल भागावरच लक्ष का?
- नव्या विधानसभेसाठी ८३ एेवजी ९० जागा असतील. परिसीमनात हे सात मतदारसंघ जम्मूत जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत जम्मूचे ४४ व काश्मिरात ४६ जागा राहू शकतात.
- जम्मूच्या चेनाब व पीर पंजाल रेंजमध्ये १५ मतदारसंघ आहेत. अशा स्थितीत हे क्षेत्र निर्णायक मानले जाते. या भागात भाजपने वर्चस्व निर्माण करू नये असा काश्मीरमधील राजकीय पक्षांचा प्रयत्न दिसून येताे.
- भाजप राज्यातील ११ टक्के अनुसूचित जाती-जमातीवर लक्ष केंद्रित करत आहे. या समुदायासाठी राज्यात एकही राखीव मतदारसंघ नाही. यात गुज्जर,

Post a Comment

 
Top