0

 जळगाव  येथील रहिवासी असणाऱ्या एका तरुणानं नागपुरातील  विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार बलात्कार  केला आहे. आरोपीनं पीडित महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत अनेकदा लैंगिक संबंध प्रस्थापित केले आहेत. यातून पीडित महिला गर्भवती  राहिल्यानंतर, आरोपीनं पीडितेवर दबाव टाकून तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं आहे. यानंतर आरोपीनं लग्नाला नकार देत, तिची फसवणूक  केली आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं जरीपटका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. देवेंद्र विकास पवार असं 38 वर्षीय आरोपीचं नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील चांदसार येथील रहिवासी आहे. तर 36 वर्षीय पीडित महिला नागपुरातील जरीपटका परिसरातील रहिवासी आहे. पीडित महिला विवाहित असून तिला एक मुलगा आणि मुलगी देखील आहे. पण पतीसोबत पटत नसल्याने गेल्या काही काळापासून पीडित महिला पतीपासून वेगळं राहत आहे.

Post a Comment

 
Top