0

 यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील निर्णायक कसोटी सामना शुक्रवारपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मैदानावर टीम इंडिया ५ वर्षांनंतर कसोटी खेळण्यासाठी उतरणार आहे. कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पुनरागमन करत आहे. पहिल्या सामन्यात त्याने विश्रांती घेतली होती. सूत्रांच्या माहितीनुसार सलामीवीर मयंक अग्रवाल अंतिम-११ मधून बाहेर असेल. आघाडीचा फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांची बॅट गेल्या काही काळापासून शांत होती, मात्र त्यांना आणखी एक संधी मिळणार असल्याचे दिसत आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या जागी मोहम्मद सिराज खेळू शकतो. इशांतला पहिल्या कसोटीत विकेट घेण्यात अपयश आले. न्यूझीलंडच्या अनुभवी रॉस टेलर आणि हेन्री निकोलस मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. सोमरविलेच्या जागी कसोटी नील वेगनर खेळू शकतो. भारतीय संघाने २०१२ पासून घरच्या मैदानावर सर्व कसोटी मालिका जिंकल्या आहेत.

मुंबईत पाऊस; पहिल्या दिवशी खेळ बिघडू शकतो
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. बुधवारी पावसामुळे दोन्ही संघांना सराव करता आला नाही. गुरुवारी सकाळीही पाऊस झाला. शुक्रवारीही पावसाचा अंदाज आहे. याशिवाय सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता आहे. याचा परिणामसामन्याच्या निकालावर होऊ शकतो.

वानखेडे : भारताच्या विजयाची सरासरी ४४, न्यूझीलंडही येथे कसोटीत विजयी :
यजमान भारतीय संघाने आतापर्यंत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या २५ सामन्यांमध्ये ११ विजय आणि ७ पराभव पत्करले आहेत. यजमान संघाने ४४ टक्के सामने जिंकले आहेत. भारताने येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या दोन कसोटीमध्ये डावाच्या फरकाने माेठ्या विजयाची नाेंद केली आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाने २ कसोटी सामन्यांमध्ये एक विजय आणि एक पराभव स्वीकारला आहे. १९८८ मध्ये येथे झालेल्या सामन्यात किवी संघाने भारताचा १३८ धावांनी पराभव केला होता.

Post a Comment

 
Top