अभिनेत्री कंगना रनोट हिने सोशल मीडिया स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने हिमाचलमधून पंजाबमध्ये येत असताना शेतकऱ्यांनी तिच्या कारवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे,"मी पंजाबमध्ये प्रवेश करत असताना एका जमावाने माझ्या कारवर हल्ला केला. ते शेतकरी असल्याचे सांगत आहेत".
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. मोदींच्या त्या घोषणेनंतर कंगनाने एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. कृषी कायद्याच्या निर्णयावर भडकलेली कंगना भारताला 'जिहादी देश' असे म्हणाली होती. त्यानंतर कंगनाने शेतकरी आंदोलनाला 'खलिस्तानी आंदोलन' म्हटले होते.
Post a Comment