0

 कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे जगात चिंता वाढली आहे. डेल्टा व्हेरिएंटपेक्षा घातक असलेल्या या व्हेरिएंटसमोर व्हॅक्सीन सुद्धा पूर्णपणे काम करत नाहीत असे चित्र आहे. डेल्टा व्हेरिएंटने देशात कोरोनाची दुसरी लाट आणली होती. आता ओमिक्रॉन 15 देशांपर्यंत पोहोचला आहे. भारतात ओमिक्रॉन पसरल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

भारतात दुसरी लाट आली तेव्हा प्रशासन त्यासाठी तयार नव्हते. हॉस्पिटल बेड असो की व्हेंटिलेटर, औषधी आणि ऑक्सिजन. सर्वांची कमतरता असल्याने अनेकांनी रस्त्यावर प्राण सोडले. आता ओमिक्रॉनमुळे भारतासह जगभरात कोरोनाची तिसरी लाट येणार अशी भीती आहे.

अशात दुसऱ्या लाटेतून धडा घेऊन भारत सरकारने काय तयार केली आहे हे समजून घेऊ. सोबतच ज्या ठिकाणी कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत त्या ठिकाणी परिस्थिती काय आहे? राज्यांकडे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत का? पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत किती ऑक्सिजनची गरज होती आणि आता आपल्याकडे किती आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत?

सर्वप्रथम, एका रुग्णाला किती ऑक्सिजनची गरज?

एप्रिल 2020 मध्ये राष्ट्रीय आरोग्य मिशनने राज्यांना एक पत्र पाठवले होते. त्यामध्ये सांगितले होते, की एका सामान्य हॉस्पिटल बेडवर उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णाला एका मिनिटाला सरासरी 7.14 लिटर ऑक्सिजनची गरज असते. तसेच ICU मध्ये दाखल असलेल्या पेशंटला मिनिटाला 11.90 लिटर ऑक्सिजनची आवश्यकता आहे. याच आधारे राज्यांनी ऑक्सिजनचे नियोजन करावे.

यानंतर एप्रिल आणि जून 2021 मध्ये सरकारने गाइडलाइन्समध्ये काही बदल केले. जूनमध्ये जारी करण्यात आलेल्या गाइडलाइन्सनुसार, ICU मध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णाला मिनिटाला 30 लिटर आणि सामान्य बेडवरील रुग्णाला मिनिटाला 10 लिटर ऑक्सिजन लागेल.

केंद्राने राज्यांना सांगितले होते अशी तयारी करा?

कोरोनाची दुसरी लाट टोकावर असताना जितकी प्रकरणे सापडली होती, त्या तुलनेत 1.25 पट अधिक रुग्णांचा विचार करून पुढल्या लाटेसाठी तयारीला लागा असे केंद्राने राज्य सरकारांना सांगितले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील पीक असताना भारतात 4 लाखांपेक्षा अधिक रुग्ण सापडले होते. यासोबतच, तिसऱ्या लाटेत एकूण कोरोना रुग्णांपैकी 23% रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागू शकते. त्या दृष्टीकोनातून नियोजन करावे असेही केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

पहिल्या व दुसऱ्या लाटेत किती ऑक्सिजन लागले?

जुलै 2021 मध्ये लोकसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सरकारने सांगितले होते, की पहिली लाट टोकावर असताना रोज सरासरी 3,095 टन ऑक्सिजनची गरज पडत होती. दुसऱ्या लाटेत यामध्ये 3 पटीने वाढ झाली अर्थात रोज 9 हजार टन ऑक्सिजन लागत होते.

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी कशी?

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रात सापडत आहेत. अशात या राज्यांनी कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेशी दोन करण्यासाठी कोणती तयारी केली, हे जाणून घेऊ...

देशात एकूण सक्रीय रुग्णांच्या बाबतीत केरळ सर्वात वर आहे. राज्यात एका दिवसात जवळपास 550 टन ऑक्सिजनची निर्मिती केली जाऊ शकते. ऑगस्टमध्ये केरळात सर्वाधिक रुग्ण सापडले होते. त्यावेळी या राज्यात रोज 110 टन ऑक्सिजन लागत होते. हीच गोष्ट लक्षात ठेवून केरळने आपले ऑक्सिजन उत्पादन 5 पटीने वाढवले आहे.

महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाल्यास दुसरी लाट सुरू असताना महाराष्ट्रात सक्रीय रुग्णांची संख्या 6 लाखांपेक्षा जास्त झाली होती. त्यावेळी राज्यात रोज जवळपास 1700 टन ऑक्सिजनची गरज होती. तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून राज्य सरकारने 619 PSA प्रेशर स्विंग अॅब्जॉर्प्शन लावण्याची तयारी केली. त्यातील 150 इंस्टॉल सुद्धा झाले आहेत. यासोबतच ऑक्सिजन स्टोअरेजची मर्यादा सुद्धा 3 हजार टन केली आहे.

Post a Comment

 
Top