0

 सॉफ्टबँक समर्थित भारतीय अन्न वितरण स्टार्टअप स्विगीकडून गुरुवारी सांगण्यात आले की, ते स्पर्धात्मक देशांतर्गत बाजारपेठेत त्यांचे स्थान आणखी मजबूत करण्यासाठी त्यांच्या किराणा वितरण सेवा इन्स्टामार्ट मध्ये ७०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करेल. किराणा डिलिव्हरी सेवा इन्स्टामार्ट पहिल्यांदा बेंगळुरूमध्ये सुरू करण्यात आली होती आणि यानंतर गेल्या वर्षी गुरुग्राममध्ये किराणा डिलिव्हरी सेवा इन्स्टामार्ट उघडण्यात आले आहे. याच दरम्यान पुढील तीन तिमाहीत १ अब्जच्या सकल व्यापारी मूल्य दरापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे. तसेच स्विगीची सेवा ही देशातील १८ शहरांमध्ये पसरलेली आहे आणि दर आठवड्याला १ दशलक्षाहून अधिक ऑर्डर वितरित करते. याशिवाय देशातील प्रमुख शहरांमध्ये १५ मिनिटांत डिलिव्हरी करण्याच्या टार्गेटवर काम करत असल्याच स्विगीने सांगितले आहे.

देशव्यापी लॉकडाऊनमुळे होम डिलिव्हरी सेवा देणाऱ्या कंपन्यांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागला. पण, स्विगी किंवा अशा इतर कंपन्यांमुळे, लॉकडाऊनच्या कठीण परिस्थितीतही लोकांना होम डिलिव्हरीची सुविधा मिळत राहिली. सरकारी अंदाजानुसार २०२४ पर्यंत भारतीय ऑनलाइन किराणा बाजार १८.२ बिलियनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. तर २०१९ मध्ये भारतीय ऑनलाइन किराणा मालाची बाजारपेठ १.९ अब्ज इतकी होती.

Post a Comment

 
Top