कल्याण : गेल्या काही दिवसात परदेशातून कल्याण-डोंबिवलीत आलेल्या प्रवाशांपैकी आणखी सहा जणांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या करोनाबाधितांची प्रकृती स्थिर असून या सर्व रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची करोना लक्षणे आहेत. त्यांना संस्थात्मक विलगीरणात ठेवण्यात आलं आहे. या रुग्णांना ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटची बाधा झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment