उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका १२वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिला एका ठिकाणी ५ दिवस डांबले आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपी हा शेजारी राहतो.
ऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या मुलीचे शेजारी राहणाऱ्या तरुणाने अपहरण केले. त्यानंतर तिला एका ठिकाणी डांबून ठेवले. तिथे सलग पाच दिवस तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिला धमकावून दयनीय अवस्थेत तिच्या घराबाहेर फेकून पसार झाला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरण, बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
बिधनू पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन आझाद नगरमध्ये राहणाऱ्या मजुराची मुलगी १२ वीमध्ये शिकत आहे. गृहपयोगी वस्तू घेण्यासाठी २८ जानेवारीला ती बाजारात गेली होती. मात्र, ती बराच उशिर झाला तरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही.
Post a Comment