0

 

पत्नीला अमेरिकेतून यायचे नाही, पतीला कोर्टाचे धक्के द्यायचे हे मंजूर नाही : कोर्टगुजरात उच्च न्यायालयात एका महिलेच्या भावाला पॉवर ऑफ अॅटर्नी देऊन पतीकडून पोटगी मागण्याचे प्रकरण आले आहे. महिला १० वर्षांपासून पतीपासून विभक्त होऊन अमेरिकेत राहत आहे. दांपत्यास एक मुलगा असून तो आजोळी राहत आहे. न्या. जे.बी. पारडीवाला व न्या. निरल मेहता यांच्या पीठाने मध्यमार्ग शोधत सांगितले की, महिलेने पती, मुलगा आणि लग्नास एकीकडे ठेवले आहे. स्वत: भारतात येण्यास तयार नाही. सर्व जबाबदाऱ्या टाळत पोटगीचा हक्क मागत आहे. हे कोणत्या प्रकारचे संबंध आहेत. उच्च न्यायालयाने दांपत्याच्या १० वर्षांच्या मुलाच्या स्थितीवर खेद व्यक्त सल्ला दिला की, मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी दांपत्य मुलासाठी आजीवन पोटगी देऊन विभक्त व्हावे.

पीठाने महिलेला भारतात येऊन लग्नाबाबत अंतिम निर्णय घेण्याबाबत भावाला ताकीद दिली. भावाने न्यायालयाला सांगितले की, बहीण १० वर्षांपासून अवैध पद्धतीने अमेरिकेत राहत आहे. पती बोलवत असताना येत नाही आणि ती घटस्फोटही देऊ इच्छित नाही.

पत्नीचे वागणे योग्य नाही
उच्च न्यायालय म्हणाले, पत्नीला अमेरिकेहून यायचे नाही आणि पतीला कोर्टाचे धक्के द्यायचे आहेत हे मान्य नाही. पतीने सांगितले की, पत्नी मुलाला अमेरिकेत घेऊन जात नाही, मलाही ताबा देत नाही. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत सांगितले की, महिलेची अशी वागणूक राहिल्यास मुलाचा ताबा वडिलांकडे सोपवला जावा.


Post a Comment

 
Top