0

 मागील काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कडाक्याची थंडी जाणवत आहे. यानंतर आता राज्यात अवकाळी पावसाची (non seasonal rain) स्थिती निर्माण झाली आहे. येत्या दोन दिवसानंतर मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट (rain and hailstorm) होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता निर्माण झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बी हंगामात निर्माण झालेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडं मोडण्याची शक्यता आहे.

Post a Comment

 
Top