0

 तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि आणखी 13 जवानांचे मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाले आहे.

या दुर्घटनेत ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, विंग कमांडर पीएस चौहान, स्क्वाड्रन लीडर के सिंह, नाईक गुरसेवक सिंह, नाईक जितेंद्र कुमार, लान्स नाईक विवेक कुमार, लान्स नाईक बी. साई तेजा, ज्युनियर वॉरंट ऑफिसर दास, ज्युनियर वॉरंट ऑफिसर ए प्रदीप आणि हवालदार सतपाल अशा 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे एकटे या घटनेत बचावले आहे.

Post a Comment

 
Top