0

 मुंबईतील क्रूझ पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनचा एका व्यक्तीसोबत सेल्फीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्या सेल्फीत किरण गोसावी आणि आर्यन होते. अखेर पोलिसांनी किरण गोसावी ताब्यात घेतले आहे.

पालघर मधील दोन तरुणांना नोकरीचे आमिश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी पालघरमधील केळवे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पुणे पोलिसांनी किरण गोसावी याला अटक केल्यानंतर आता पालघरच्या केळवे पोलिसांनी देखील गोसावीला ताब्यात घेतले आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

पालघर जिल्ह्यातील एडवण येथील उत्कर्ष तरे आणि आदर्श किणी या दोन तरुणांना मलेशिया येथे नोकरीचे अमिष देऊन त्यांच्याकडून दीड लाख रुपयांची रक्कम गोसावीने बँक खात्यामार्फत घेतली होती. त्यांच्या नवी मुंबई येथील केपी इंटरप्रायजेस या कार्यालयातून तो आपली सूत्रे हलवत असल्याची माहिती आहे. या दोन मुलांना तिकीट आणि व्हिजा दिल्यानंतर ते विमानतळावर गेल्यावर तिकीट आणि व्हिजा बनावट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर, दोन्ही तरुणांनी केळवे पोलिस ठाणे गाठत गोसावी विरुद्ध तक्रार दाखल केली होती.

तरुणांकडे भक्कम पुरावे पाहता आरोपी किरण गोसावी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्य न दाखविल्याने त्या दोन्ही तरुणांचा तक्रार अर्ज केळवे पोलिस ठाण्यात अनेक दिवसांपासून धूळ खात पडून होता. मात्र आर्यन खान प्रकरण पुढे आल्यानंतर किरण गोसावी पुन्हा चर्चेत आले. त्यामुळे त्या मुलांनी केलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...

Post a Comment

 
Top