0

 वाघा सीमेवरून भारतात प्रवेश करणाऱ्या श्रीमती संजीव खूप भावुक झाल्या हाेत्या. माझ्या डाेळ्यांतील आनंदाश्रू पाकिस्तानातील नागरिकांनी दिलेल्या प्रेमाला दर्शवणारे आहेत. ही यात्रा मी हयातभर विसरू शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्या ८७ भाविकांच्या जथ्थ्याद्वारे पंजाबच्या चकवाल येथील कटासराज मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी आल्या हाेत्या. सात दिवसांची ही यात्रा आहे. या काळात कटासराज व कृष्ण मंदिरात पूजा करता आली. त्याचबराेबर पाकिस्तानच्या पदार्थांचा आस्वादही ‌घेता आला.

भारतातून येणाऱ्या लाेकांना जास्तीत जास्त व्हिसा देण्यात यावा अशी आमची पाकिस्तानला विनंती आहे. एक अन्य भाविक राकेश अराेरा म्हणाले, पाकिस्तानात असताना इतर देशात असल्यासारखे वाटत नव्हते. कटासराज मंदिर वास्तुकलेच्या दृष्टीने अद्वितीय आहे. सरकार व मंदिर व्यवस्थापनाकडून मंदिराची चांगल्या प्रकारे देखरेख केली जात आहे, हे यावरून दिसून आले आहे. विजय कुमार शर्मा म्हणाले, लाहाेर शहर प्रत्येक भारतीयाच्या हृदयाजवळ आहे. हे शहर कला व बहुसांस्कृतिकतेचा वारसा जपणारे आहे.

पाकिस्तानच्या आदरातिथ्याने आम्ही भारावून गेलाे आहाेत. भाविकांनी अनारकली बाजार, एम्पाेरियम माॅलला देखील भेट दिली. तेथे दागिने, कपडे, बांगड्या इत्यादीची खरेदी केली. महिला भाविक म्हणाल्या, आई व बहिणीसाठी विशेष शालीची खरेदी केली आहे. हा दुपट्टा भारतात देखील प्रसिद्ध आहे.

अन्य एक महिला म्हणाली, भारताच्या तुलनेत पाकिस्तानात सुकामेवा निम्म्या दरात मिळताे. म्हणूनच अक्राेट, पिस्ता, बदाम खरेदी केले आहे. त्याशिवाय लाहाेरची जुती, येथील पारंपरिक कपडे येथे मिळतात. आम्ही भारतातून आल्याचे त्यांना कळाल्यानंतर व्यापाऱ्यांनी खरेदीवर भरभरून डिस्काउंटही दिले.

लाहाेर न्यायालयात पाक कलाकारांकडून हिंदी गाण्यांचे सादरीकरण
भाविकांसाठी लाहाेर किल्ल्यात संगीत कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. स्थानिक कलाकारांनी भारतीय चित्रपट गीतांचे सादरीकरण केले. गंगाराम हेरिटेज फाउंडेशनचे संचालक सय्यद शाहीद हसन यांनी भाविकांचे स्वागत केले. कटासराज मंदिरातील तलाव महादेवांच्या अश्रूतून साकारला आहे. सतीचे पार्थिव घेऊन तांडव करताना महादेवांचे अश्रू आेघळले हाेते.

Post a Comment

 
Top