0

 पुणे : ट्रॅव्हल्स बसवर कारवाई न करण्यासाठी ५ हजार रूपयांची लाच घेताना लोणी काळभोर येथील वाहतूक शाखेच्या पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुहास भास्कर हजारे (वय ३५) असं अटक केलेल्या पोलिसाचं नाव आहे. (Bribe Case In Pune)


याप्रकरणी २७ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार हे ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये मॅनेजर म्हणून नोकरीवर आहेत. स्वारगेट ते सोलापूर अशा त्यांच्या ट्रॅव्हल्स बस प्रवासी वाहतूक करतात. तक्रारदार यांच्या ट्रॅव्हल्स बसवर कारवाई न करण्यासाठी ६ हजार रूपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) जाऊन याबाबत तक्रार दिली.

Post a Comment

 
Top