सेंच्युरियन, 25 डिसेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातल्या 3 टेस्ट मॅचच्या सीरिजला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मॅचआधी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) प्लेयिंग इलेव्हनबाबत कोणतेही संकेत दिले नाहीत, पण टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी कठीण संवादाबाबत द्रविड बोलला आहे. टीममध्ये निवड झाली नाही आणि खेळाडू नाराज झाले तर ती चांगली गोष्ट आहे, कारण यामुळे त्यांना टीममध्ये स्थान मिळवण्याचं महत्त्व माहिती आहे, असं द्रविड म्हणाला. भारताला अजून दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही.
राहुल द्रविडला इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या सीनियर खेळाडूंबाबत काय चर्चा झाली? असं विचारण्यात आलं. गेल्या काही काळापासून हे दोन्ही खेळाडू फॉर्ममध्ये नाहीत, त्यामुळे दोघांनाही पहिल्या टेस्टमध्ये संधी मिळणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, यावर द्रविडने उत्तर दिलं. 'बहुतेक खेळाडू प्रोफेशनल आहेत, अनेकवेळा खेळाडूंसोबत कठीण संवाद करावा लागतो. तू खेळू शकत नाहीस, असं एखाद्या खेळाडूला सांगणं कठीण असतं, कारण प्रत्येकाला खेळायचं असतं,' असं वक्तव्य द्रविडने केलं.
Post a Comment