श्री कर्तारपूरसाहिबमध्ये गुरुनानक देव यांच्या प्रकाश उत्सवात सहभागी हाेण्यासाठी भारतासह इतर देशांतून शीख समाजाचे जत्थे दाखल झाले आहेत. भाविकांचे लाहोर बाजारपेठेत अतिशय उत्साहात स्वागत केले जात आहे. लाहाेरचा अनारकली बाजार, दिल्ली गेट व आझम क्लाॅथ मार्केटमध्ये सध्या गर्दी पाहायला मिळू लागली आहे. महिला पाकिस्तानी कुर्ती, इतर कपड्यांच्या खरेदीस पसंती देत आहेत. पुरुष मंडळी शाही किल्ला, मिनार-ए-पाकिस्तानसह शीख धर्मीयांच्या पवित्र स्थळांची भ्रमंती करू लागले आहेत. एका दुकानात खरेदी करणाऱ्या हुसैना सिंह म्हणाल्या, प्रकाश उत्सवात सहभागी झाल्यानंतर आता लाहाेरच्या प्रसिद्ध वस्तूंची खरेदी करत आहाेत.
लाहाेरमध्ये आम्हाला घरी असल्यासारखे वाटू लागले आहे. पाकिस्तानचे लाेक आमचे स्वागत करू लागले आहेत. दुकानदारही वस्तूंची माफक दरात विक्री करत आहेत. माझी भाची व नणंद यांच्या आवडीनुसार त्यांच्यासाठी पाकिस्तानी कुर्ती खरेदी करत आहाेत, असे त्यांनी सांगितले.
गाेबत सिंह म्हणाले, येथील व्यंजन स्वादिष्ट आहेत. आम्ही त्याचा आस्वाद घेत आहाेत. काेणत्याही हाॅटेलमध्ये गेल्यानंतर आमचे मनापासून स्वागत केले जाते. आम्ही पाकिस्तानातून अनेक आठवणी घेऊन भारतात परतू.
साहिब सिंह म्हणाले, लहानपणी लाहाेरबद्दल खूप एेकले हाेते. परंतु कधी पाहण्याचा याेग आला नव्हता. परंतु आता लाहाेर पाहिल्याचे अभिमानाने सांगू शकताे. माझे जीवन सफल झाले आहे. लंडनमधील रहिवासी रामदीप काैर म्हणाल्या, ब्रिटनमध्ये सुकामेवा अतिशय महाग आहे. पाकिस्तानात त्यामानाने अतिशय स्वस्त दरात मिळताे. त्यामुळे खूप माेठ्या प्रमाणात त्याची खरेदी करून ब्रिटनला घेऊन जाणार आहे. स्थानिक पातळीवर तयार हाेणारे बदामाचे तेलही त्यांना खरेदी करायचे आहे.
भारतातील नातेवाइकांसाठी भेटवस्तूंची खरेदी
पाकिस्तानी जुती खरेदी करणाऱ्या बरगीता काैर म्हणाल्या, भारतात आमचे नातेवाईक आहेत. त्यांना भेट देण्यासाठी काही वस्तूंची खरेदी करणार आहाेत. काही नातेवाइकांनी विशिष्ट आकारातील जुती आणण्यास सांगितले आहे. पाकिस्तानातील बाजारपेठेत फिरताना इतर देशांत आहाेत. असे वाटतच नाही. पाकिस्तानी कपडे, जुतीचे रंग व डिझाइन आम्हाला आवडतात. गुणवत्ता देखील खूप चांगली असते.
Post a Comment