पतंग पकडण्यासाठी धावत असताना अंदाज न आल्याने ७ वर्षांच्या चिमुकल्याचा विहिरीत पडून बुडाल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सिन्नरमध्ये मंगळवारी घडली.
प्रज्वल पांडुरंग आव्हाड (७) हा ३ मित्रांसमवेत पतंग उडवत होता. पतंगामागे धावताना विहीर जवळ असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. तो सरळ विहिरीत पडला. त्याच्या पाठीमागे असलेले तिघेही जण सावध झाले. त्यांनी प्रज्वलला हाका मारल्या. मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने सर्वजण मोठ्याने रडू लागले. घरी येऊन रडत रडत घडलेली घटना सांगितली. जवळ राहणाऱ्या उपनगरातील नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. अग्निशामक दलाच्या जवानांना बोलावून प्रज्वलचा शोध घेण्यात आला. अडीच तासांनंतर प्रज्वलचा मृतदेह सापडला. त्याच्यावर दोडी येथे सोमवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. पाेलिसांनी घटनेची नाेंद केली असून सहायक पाेलिस उपनिरीक्षक माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
Post a Comment