पाकिस्तानातील सियालकोटमध्ये शुक्रवारी एका कारखान्यातील कामगारांनी त्यांच्या मॅनेजरला रस्त्याच्या मधोमध जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. मॅनेजर श्रीलंकेचा नागरिक होता. प्रियांथा कुमारा असे या व्यक्तीचे नाव आहे. सर्व कामगार पाकिस्तानचे रहिवासी आहेत.
या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. 2010 मध्येही अशीच एक घटना घडली होती. प्रियांथा नुकताच सियालकोट येथील या कारखान्यात एक्सपोर्ट मॅनेजर म्हणून रुजू झाला होता.
आधी कारखान्यातून बाहेर काढले, नंतर पेटवले
'द डॉन न्यूज'च्या वृत्तानुसार ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. सियालकोटच्या वजिराबाद रोड परिसरात एक बहुराष्ट्रीय कारखाना आहे. याठिकाणी अचानक एकच गोंधळ उडाला. मात्र, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. येथे मजुरांच्या जमावाने कारखान्याच्या एक्सपोर्ट मॅनेजरला आधी बाहेर काढून मारहाण केली. नंतर त्याचा मृत्यू झाल्यावर त्याला रस्त्यावरच जाळण्यात आले. सियालकोटचे पोलिस अधिकारी उमर सईद मलिक यांनी सांगितले की, प्रियांथा कुमारा असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो श्रीलंकेचा नागरिक होता.
Post a Comment