0

 छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री  (Tv Actress)   ते अमेठीच्या   (Amethi)  खासदार आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्री असा प्रवास करणाऱ्या स्मृति ईरानी   (Smriti Irani)  नेहमीच चर्चेत असतात.एकता कपूरच्या   (Ekta Kapoor)  'क्योंकी सास भी कभी बहू थी'   (Kyonki Saans Bhi Kabhi Bahu Thi)  मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं एक विशिष्ट स्थान निर्माण केलं होतं. त्यांना मालिकांमध्ये सर्वांनीच सासूच्या भूमिकेत पाहिलं असेल. परंतु आता त्या रिअल लाईफमध्ये सासू बनल्या आहेत. त्यांनी स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे.

अभिनेत्री आणि खासदार स्मृति ईरानी यांनी नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट त्यांच्या मुलीच्या संदर्भातील आहे.स्मृति यांनी शेअर केलेला फोटो सुंदर कपल फोटो आहे. हा फोटो त्यांची मुलगी शनैल ईरानीचा आहे. यामध्ये त्यांची मुलगी शनैलने आपल्या बॉयफ्रेंड अर्जुन भल्लासोबत साखरपुडा केल्याचं दिसत आहे. शनैल ही स्मृति ईरानी यांची सावत्र मुलगी आहे. त्यांनी आपल्या या लेकीचा फोटो शेअर करत खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दोघेही एका सुंदर अशा टेरेसवर उभारलेले दिसत आहेत. ते एकमेकांना अंगठी घालताना आहेत.

Post a Comment

 
Top