कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून देणारा सलमान खान तिच्या लग्नाला उपस्थित राहणार नाही. या वृत्ताला सलमानची बहीण अर्पिताने दुजोरा दिला आहे. अर्पिताने एका मुलाखतीत सांगितले होते की, कतरिनाने खान कुटुंबाला लग्नाचे निमंत्रण दिलेले नाही. सलमान 10 डिसेंबर रोजी रियाधमध्ये दबंग टूरमध्ये सामील होत आहे.
आम्हाला लग्नाचे कोणतेही आमंत्रण मिळाले नाही: अर्पिता
अर्पिताला लग्नाच्या आमंत्रणाबाबत विचारले असता तिने स्पष्ट नकार दिला. अर्पिताने सांगितले की, "आम्हाला अद्याप लग्नाचे निमंत्रण मिळालेले नाही." याआधी कतरिनाच्या लग्नासाठी सलमान, त्याच्या बहिणी आणि कुटुंबीयांना अधिकृत आमंत्रण पाठवण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या. लग्नाला सलमानच्या बहिणी अर्पिता खान शर्मा आणि अलविरा खान अग्निहोत्री उपस्थित राहणार असल्याचे वृत्त होते. काही आठवड्यांपूर्वी सलमान या लग्नाला उपस्थित राहणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. पण त्यानंतर सलमानचे शेड्युल खूप बिझी आहे, त्यामुळे तो कतरिनाच्या लग्नात सहभागी होणार नाही, असे सांगण्यात आले होते.
कामावर परिणाम होणार नाही
कतरिनाने सलमानला लग्नासाठी आमंत्रण दिले नसले तरी त्याचा दोघांच्या प्रोफेशनल कमिटमेंट्सवर कोणताही परिणाम होणार नाही. लग्नानंतर कतरिना आणि सलमान 'टायगर 3'चे शूटिंग एकत्र करणार आहेत. ज्याचे दिग्दर्शन कबीर खान करत आहेत. याआधी सलमान आणि कतरिनाने 'मैने प्यार क्यूं किया', 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'भारत', 'पार्टनर', 'युवराज' या चित्रपटांत एकत्र काम केले आहे.
Post a Comment