देशभरासह राज्यात चिंता वाढवणाऱ्या ओमिक्रॉनचा आता औरंगाबाद शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इंग्लंड आणिदेशभरासह राज्यात चिंता वाढवणाऱ्या ओमिक्रॉनचा आता औरंगाबाद शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इंग्लंड आणि दुबईहून आलेल्या दोन व्यक्तींची कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांच्या स्वॅबचे नमूने पुण्यातील जिनोम सिक्वेन्सिंग लॅबकडे पाठवण्यात आले होते. आज आलेल्या अहवालात या दोन्ही व्यक्तींचा ओमिक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मराठवाड्यात आतापर्यंत लातूर -१, उस्मानाबाद - ४ आणि आता औरंगाबादमध्ये - २ असे एकूण ७ ओमायक्राॅनचे रुग्ण आढळले आहेत.
काही दिवसांपूर्वी, औरंगाबाद येथील तरुण मुंबईत ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आलं होता. त्यानंतर या तरुणांच्या कुटुंबातील व्यक्तींना खबरदारी म्हणून क्वारंटाइन करण्यात आले होते. तसेच त्यांची कोरोना चाचणी केली असता तरुणाच्या वडिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे स्वॅब पुण्याला पाठवण्यात आले होते. ज्याचा रिपोर्ट आज आला असून, तरुणाचे वडील सुद्धा ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
Post a Comment