0

 रोबोट आपल्यासारख्या रोबोटला जन्म देऊ शकतात, असे सायन्स-फिक्शन चित्रपटांत दाखवले जात आहे, पण अमेरिकी वैज्ञानिकांनी ते प्रत्यक्षात आणले आहे. जगातील पहिला जिवंत रोबोट ‘जेनोबोट्स’ बनवणाऱ्या वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, हे जेनोबोट स्वत:सारख्या अपत्यालाही जन्म देऊ शकतात.

एक मिमीपेक्षाही कमी रुंद असलेले हे रोबोट्स प्रथम २०२० मध्ये जगासमोर सादर करण्यात आले होते. हे जिवंत रोबोट्स आहेत, ते मेंढीच्या भ्रूणापासून बनवण्यात आले आहेत. त्यांचे हृदय मोटारप्रमाणे वापरले जाते. जेनोबोट्स चालू शकतात, पोहू शकतात आणि न खाता अनेक आठवड्यांपर्यंत जिवंत राहू शकतात. जेनोबोट्स एकमेकांची प्रतिकृती तयार करू शकतात याला अलीकडील शोधात दुजोरा मिळाला आहे.

ते तयार करणाऱ्या व्हर्मोंट, टफ्ट्स आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या व्हायस इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी अभ्यासात सांगितले आहे की, आम्ही या जेनोबोट्समध्ये प्राणी किंवा वनस्पतींपेक्षा वेगळ्या जैविक प्रजननाचे अगदी नवे रूप शोधले आहे. हे रूप वैज्ञानिकदृष्ट्या ज्ञात कुठल्याही रूपापेक्षा पूर्णपणे वेग‌ळे आहे. अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि व्हर्मोंट विद्यापीठातील प्रा. जोश बोनागार्ड यांनी सांगितले की, जेनोबोट्स तयार करण्यासाठी मेंढीच्या भ्रूणापासून जिवंत स्टेम पेशीचा तुकडा काढण्यात आला आणि तो इनक्युबेट करण्यासाठी सोडण्यात आला. वैज्ञानिकांनी त्याच्या जनुकात कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही.

संशोधकांच्या मते, हे जेनोबोट्स फक्त आजारांत नव्हे तर निसर्गाला स्वच्छ ठेवण्यातही मदत करतील. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संयोजनाद्वारे त्यांची उपयोगिता वाढवली जाऊ शकेल. टफ्ट्स विद्यापीठातील प्रा. मायकेल लेविन म्हणाले की, हे रोबोट्स महासागर, नदी आणि तलावातून मायक्रोप्लास्टिक कचरा खेचून काढण्यास सक्षम असल्याचे नवीन प्रयोगांतून आढळले आहे. त्यामुळे त्यांच्यामार्फत स्वच्छता करता येऊ शकेल आणि पर्यावरण संरक्षणही होऊ शकेल.

तोंडात एकल पेशी जमा करून स्वत:सारखे रोबोट तयार करतात

हे जेनोबोट्स ‘पॅक-मॅन’ प्रमाणे तोंडात एकल पेशी जमा करतात आणि ‘मुलां’ना बाहेर काढतात. ते अगदी आई-वडिलांसारखे दिसतात. संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, हे जेनोबोट्स कॅन्सरसह अनेक गंभीर आजारांच्या उपचारात क्रांती आणू शकतात. त्यात गंभीर घाव, जन्माच्या वेळचे दोष आणि वयाशी संबंधित आजारांचा समावेश आहे. भविष्यात हे जेनो

Post a Comment

 
Top