0

 कतरिना कैफ आणि विकी कौशलचा विवाहसोहळा सुरू होण्यासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. पण अद्याप या दोघांनीही त्यांच्या लग्नाबाबत मौन बाळगले आहे. आता बातमी आहे की, मीडिया आणि पापाराझींना टाळण्यासाठी विकी आणि कतरिना जयपूरहून वेडिंग वेन्यू म्हणजेच सिक्स सेंसे फोर्ट बरवाडा येथे हेलिकॉप्टरने जाणार आहेत. जयपूर ते बरवाडा हे अंतर सुमारे 181किमी आहे. रस्त्याने लग्नाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी 2 तास लागतात.

लसीकरण नसल्यास प्रवेशबंदी
विकी-कतरिनाच्या लग्नाशी संबंधित नॉन-डिस्क्लोजर करारावर स्वाक्षरी केल्यानंतर, आणखी एक नियम लागू केला जात आहे. देशात ओमायक्रॉनचे संकट बघता सवाई माधोपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे की, लग्नाला येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. असे न करणाऱ्या पाहुण्यांना प्रवेश मिळणार नाही.

लग्न स्थळाजवळ ड्रोन दिसले तर ते टिकणार नाही
वृत्तानुसार, लग्नाचे फंक्शन 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 9 डिसेंबरला दोघेही हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करणार आहेत. याआधी ते मुंबईत कोर्ट मॅरेजही करत आहेत. याशिवाय त्यांचा वेडिंग लूक व्हायरल होऊ नये यासाठी त्यांच्या वेडिंग प्लानरने जवळपास दिसणारे कोणतेही ड्रोन पाडण्याची तयारी केली आहे.

Post a Comment

 
Top