0

 सांगली : जिल्ह्यात चार दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा तडाखा बसला आहे. द्राक्ष, ज्वारी, हरभरा, भाजीपाल्यासह ११ हजार ९३९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. (Sangali News Update)


द्राक्ष बागांचे सर्वाधिक १० हजार ६३९ हेक्टरवरील नुकसान झालं आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने शनिवारी राज्य शासनाकडे सादर केला. द्राक्षबागांचे नुकसान प्रशासनाकडून निश्चित करण्यात आलं नसलं तरी सुमारे १३ ते १५ हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना, राज्य सरकारकडून मात्र अद्यापही नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश आलेले नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये सरकारच्या विरोधात नाराजी आहे

Post a Comment

 
Top