0

 तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे शेकोबा डोंगरावर एका युवकासह दोन तरुणींनी विषारी औषध प्राशनकरून आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक (Shocking News) घटना गुरुवारी समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून (Love Affair) आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. मात्र एक तरुण आणि दोन तरुणींनी एकाचवेळी आत्महत्या केल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू असून नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत तासगाव पोलिसांत नोंद झाली आहे.

हरिष हणमंत जमदाडे (वय 21), रा. मणेराजुरी, प्रणाली उध्दव पाटील(वय 19) मुळ रा. जायगव्हाण, सध्या रा. मणेराजुरी आणि शिवाणी चंद्रकांत घाडगे(वय 19) रा. हतीद, ता. सांगोला, जि. सोलापूर अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती नुसार मणेराजुरी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शेकोबा डोंगर आहे. या डोंगरावर गुरुवारी सकाळच्या सुमारास गावातील काही नागरिक जात असतानाच त्यांना तिघेजण मृतावस्थेत आढळून आले. याची माहिती पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पवार यांना देण्यात आली. त्यानी घटनास्थळी येत याची माहिती पोलिसांना दिली.

Post a Comment

 
Top