0

 मिर्झापूर' या वेबसीरिजमध्ये मुन्ना भैय्याचा खास मित्र ललितची भूमिका साकारणारा अभिनेता ब्रह्मा मिश्रा याचे निधन झाले आहे. 29 नोव्हेंबर रोजी छातीत दुखू लागल्याने डॉक्टरांनी त्याला अपचनाचे औषध देऊन घरी पाठवले. मात्र घरीच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याची प्राणज्योत मालवली.

ब्रह्मा मिश्राचा मृतदेह तीन दिवस घरातील बाथरूममध्ये पडून होता. सध्या मुंबईतील पोलीस त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करत असून त्यानंतर त्याची मृत्यूची नेमकी वेळ आणि कारण कळू शकेल.

मुंबईतच होतील अंत्यसंस्कार
ब्रह्माच्या जवळच्या कुटुंबातील सदस्याने दैनिक भास्करला सांगितले की, त्याचा फोन 29 तारखेपासून बंद होता. 2 दिवस फोन चालू न झाल्याने भाऊ संदीपने त्याचा FTII चा मित्र आकाश सिन्हा याला घरी पाठवले त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. आकाश ब्रह्माच्या घरी पोहोचला तेव्हा तेथून दुर्गंधी येत होती आणि मृतदेह कुजत होता. त्यामुळे ब्रह्माचे अंतिम संस्कार आता शुक्रवारी सकाळी मुंबईतच करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.

Post a Comment

 
Top