0

 ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवारी भुजबळ नाॅलेज सिटीत सजलेल्या कुसुमाग्रजनगरीत दिमाखात उद्घाटन होत आहे. सायंकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर, मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार आहे.

साहित्य संमेलन उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध पटकथालेखक व गीतकार जावेद अख्तर यांच्याशी संमेलनाच्या पूर्वसंध्येला स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी खास ‘दिव्य मराठी’साठी साधलेला मुक्त संवाद...

साहित्य संमेलनानिमित्ताने तुमच्या शायरीच्या खास अंदाजात आजच्या भावना कशा व्यक्त कराल, असे विचारताच जावेदजींनी अर्ध्या तासापूर्वीच सुचलेला हा शेर पेश केला..
कभी होठों पे इन्हें लावो कभी हातों में
ख्वाब आँखों ही में रहते है तो मर जाते है

Post a Comment

 
Top