ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. देशात पहिल्यांदा एका दिवसात तब्बल आठ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक रुग्ण न्यू साऊथ वेल्समध्ये आढळले असुन, येथे 5715 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
तर एका जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री ब्रँड हॅजॉर्ड यांनी सांगितले की, आज आढळेल्या रुग्णांमध्ये सुमारे 80 टक्के रुग्णांचा अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया राज्यात घर वगळता इतर ठिकाणी 8 वर्षांपेक्षा पुढील वयोगटातील नागरिकांना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे.
ओमायक्रॉनचा परिणाम ख्रिसमस आणि नववर्षाच्या उत्सावावर पडल्याचे पाहायला मिळत आहे. मेलबर्न येथील हॉटेल व्यावसायिक नरेंद्र गर्ग म्हणाले की, लॉकडाऊनमुळे त्यांना दीड कोटी रुपये नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे नवीन वर्षांसाठी लोकांनी केलेली बुकिंग देखील रद्द केली जात आहे. मोनाश यूनिवर्सिटीचे प्रो. विनोद मिश्रा यांच्यासोबत दिव्य मराठीने संवाद साधला असता ते म्हणाले की, देशात लसीकरणावर अधिक भर दिले जात आहे. त्यामुळे ओमायक्रॉनचा धोका कमी आहे.
Post a Comment