0

 बई : अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेला 83 हा सिनेमा आज, २४ डिसेंबर रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर निर्मात्यांना एक मोठा धक्का बसला आहे. कारण प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला. करोनामुळे हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी प्रदीर्घ काळ वाट बघावी लागली होती. अखेर तो आज प्रदर्शित झाल्याने निर्मात्यांनी आनंद व्यक्त केला. परंतु त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही... दरम्यान सिनेमागृहांत प्रदर्शित झालेल्या सिनेमाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद दिला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 83 सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तो टोरेंट, फ्लिमी वॅट, ऑनलाईन मूव्ही वॉच, १२३ मूव्हीज, १२३ मूव्ही रुल्ज, फिल्मी आणि अन्य काही पायरेटेड साईट्सवर हा सिनेमा उपलब्ध झाला आहे. इतकेच नाही तर टेलीग्रामवर देखील हा सिनेमा उपलब्ध आहे. हा सिनेमा ऑनलाईन लीक झाल्यामुळे त्याच्या बॉक्स ऑफिसवरील गल्ल्यावर विपरीत परिणाम होण्याची भिती निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. कारण करोना आणि त्यानंतर आता ओमिक्रॉनचे भीती यामुळे नागरिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत आहेत. जर हा सिनेमा ऑनलाईन बघायला मिळत असेल तर ते सिनेमागृहात जाणार नाही अशी भितीही व्यक्त होत आहे.

Post a Comment

 
Top